अभिनेत्री मृणाल दुसानिसनं वेगवेगळ्या मालिकामध्ये काम केलं आहे. 'माझिया प्रियाला प्रित कळेना', 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकांमधून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीस आली. मृणालच्या घरी मार्च 2022 मध्ये एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं. मृणालनं तिच्या मुलीचं नाव नुर्वी असं ठेवलं आहे. नुर्वीच्या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती मिळते. नुकतीच मृणालनं तिच्या मुलीसाठी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मृणालनं लिहिलं, 'तुम्ही सगळे कसे आहात? खूप कष्टानं मी हा फोटो काढला आहे. हा आमचा पहिला फोटो. त्यामुळे हा फोटो माझ्यासाठी खास आहे. ' मृणाल ही सोशल मीडियावर सक्रिय असते. मृणाल तिच्या लेकीचे विविध लूकमधील फोटो देखील शेअर करते. मृणालनं 2016 साली नीरज पंडीत सोबत लग्नबंधनात अडकली होती.