'बाळूमामा' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमित पुसावळे नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 'बाळूमामा' मालिकेत सुमित पुसावळे मुख्य भूमिका साकारत आहे.
अभिनेता सुमित पुसावळे आणि मोनिका महाजन यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. 14 डिसेंबर रोजी सोलापूरमधील सांगोला येथे धूमधडाक्यात हा सोहळा पार पडणार आहे.
अभिनेता सुमित पुसावळेने अलिकडेच सोशल मीडियावर प्री-वेडींग शूट शेअर केलं होते. तेव्हापासून सुमित चर्चेत आला आहे.
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या कलर्स मराठीवरील मालिकेतून सुमित पुसावळेला प्रसिद्धी मिळाली.
सुमित आणि मोनिका यांचं पारंपारिक पद्धतीनं लग्न पार पडलं. दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केल आहेत.
या फोटोमध्ये सुमित आणि मोनिका पारंपारिक वेशामध्ये दिसत आहेत. या फोटोंमधील दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
सुमित पुसावळे या आधी 'लागिर झालं जी' या मालिकेमध्ये एका छोट्या भूमिकेत झळकला होता. पण त्याला खरी प्रसिद्धी बाळूमामा या मालिकेतून मिळाली.
सुमित आणि मोनिका यांच्या लगीनघाईचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटो आणि व्हिडीओंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सुमित पुसावळेच्या लग्नात त्याची ऑनस्क्रीन पत्नी सत्यवा म्हणजेच अभिनेत्री कोमल मोरे हिनेदेखील हजेरी लावली होती. या सोबतच 'लागिर झालं जी' मालिकेची टीमसुद्धा सुमितच्या लग्नात पोहोचली होती.
सुमित आणि मोनिका यांचं लग्न थाटामाटात पार पडलं. कुटुंबिय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांचा शुभविवाह पार पडला.