‘मॅडम सर’ फेम टीव्ही अभिनेत्री ईशा कंसारा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ईशा कंसाराचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला. (PC : @esharkansara/Instagram)
अलिकडेच ईशाने लग्नाचे फोटो शेअर करून तिच्या लग्नाची गोड बातमी चाहत्यांनी दिली. त्यानंतर आता तिने संगीत सोहळ्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (PC : @esharkansara/Instagram)
लग्नानंतर आता ईशाने तिच्या संगीत सोहळ्याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ईशा आणि तिचा पती सिद्धार्थ अमित भावसर आनंद दिसत आहे. (PC : @esharkansara/Instagram)
ईशा कंसाराने शेअर केलेले फोटो पाहता तिचा संगीत सोहळा मजेशीर क्षणांनी भरलेला होता हे स्पष्ट होते. सर्वांनी संगीत सेरेमनी खूप एन्जॉय केली. (PC : @esharkansara/Instagram)
'जिंदगी मेरे घर आना', 'मॅडम सर' आणि 'मुक्ती बंधन' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या ईशा कंसाराने आता लग्नगाठ बांधली आहे. (PC : @esharkansara/Instagram)
ईशा कंसाराने त्यांच्या संगीत सेरेमनीमध्ये पती सिद्धार्थ अमित भावसारसोबत संगीत खुर्ची खेळली. तसेच बुलेट राईडही केली. (PC : @esharkansara/Instagram)
ईशा कंसारा लेहेंगा आणि शूज अशा युनिक कॉम्बिनेशनमध्ये दिसली. ईशाने शूज घालून जबरदस्त डान्स केला. (PC : @esharkansara/Instagram)
ईशा कंसारानेही तिच्या आईवडीलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या आई-वडिलांना मिठी मारून रडताना दिसत आहे. (PC : @esharkansara/Instagram)
ईशाने संगीत सोहळ्यासाठी निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता आणि बन हेअरस्टाईल केली होती. तर तिचा नवरा सिद्धार्थ काळ्या कुर्ता-पायजामामध्ये दिसला. (PC : @esharkansara/Instagram)
ईशाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Issa vibe!'.
ईशा आणि सिद्धार्थच्या संगीत सेरेमनीचे फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (PC : @esharkansara/Instagram)