‘आसमां से आगे’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री वृशिका मेहता हिचा साखरपुडा झाला आहे. 18 डिसेंबर रोजी वृशिकानं तिच्या साखरपुडाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सौरभ आणि वृशिका यांचा 11 डिसेंबर रोजी साखरपुडा झाला. सौरभ हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तर वृशिका ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2023 मध्ये सौरभ आणि वृशिका हे लग्नगाठ बांधणार आहेत, असं म्हटलं जात आहे. इश्कबाज फेम अभिनेत्री वृशिकानं तिच्या साखरपुड्याला ग्रे कलरचा लेहंगा आि सिल्वर ज्वेलरी असा लूक केला होता. वृशिकाला ‘दिल दोस्ती डान्स’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. ‘इश्कबाज’, ‘ये तेरी गलियां’ और ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकांमध्ये देखील तिनं काम केलं. सौरभ आणि वृशिका यांच्या साखरपुड्याच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. अनेकांनी या फोटोला कमेंट करुन सौरभ आणि वृशिका यांना शुभेच्छा दिल्या आहेत.