नवविवाहित जोडपं मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी बर्फाच्छादित काश्मीर हे त्यांचे हनिमून डेस्टिनेशन म्हणून निवडलं. नयनरम्य दरीतील या जोडप्याच्या फोटोमुळे चाहत्यांना त्यांची बॅग पॅक करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात गोव्यात अनेक टेलिव्हिजन स्टार्सच्या उपस्थितीत मौनी आणि सूरजने लग्नगाठ बांधली. त्यांनतर दोघे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी काश्मीरमध्ये पोहोचले. मौनी इंस्टाग्रामवर तिच्या काश्मीर गेटवेचे अनेक क्लिक आणि व्हिडिओ शेअर करत आहे. तिने स्वतःचे पुस्तक हातात घेतलेली आणि बर्फाच्या पार्श्वभूमीत काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. तिने सूरजसोबतही काही क्लिक शेअर केले आहेत. (photo: MouniRoy/ig)