मौनी रॉययने दोन दिवसांपूर्वी आपल्या गर्ल गँगसोबत हॅलोवीन पार्टीचा आनंद लुटला. हॅलोवीनचे काही फोटो मौनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हॅलोवीन पार्टीनंतर देखील मौनीने आपले काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनीचा विंटेज लूक दिसत आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत हॅलोवीन साजरे केले जाणार आहे. मौनीने देखील ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत तिचा लूक विंटेज असल्याचे सांगितले आहे. नेकपीससह मौनीने तिचा लूक पूर्ण केला. चित्रांमध्ये पाहिल्याप्रमाणे, मौनी रॉयने तिच्या डोळ्यांमध्ये खोल काजळ लावले आहे. या फोटोंमध्ये मौनी रॉय पांढरा टॉप आणि ब्लॅक जेगिंग्ज घातलेली दिसत आहे. मौनी रॉयने तिचे केस मोकळे ठेवले आहेत. मौनीचे केस कुरळे झाले आहेत.