टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयने काही दिवसांपूर्वी सूरज नांबियारसोबत लग्न केले. मौनी सध्या तिच्या वैवाहिक जीवनाचा खूप आनंद घेत आहे. मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती स्वतःबद्दल अपडेट देत असते. चाहतेही मौनीच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. मौनीने काही वेळापूर्वी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये मौनी इतकी जबरदस्त दिसत आहे की, तिच्या या लूकवरून नजर हटवणे कठीण झाले आहे. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा सूट परिधान केलेला दिसत आहे. मौनी काळ्या रंगाच्या सूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. मौनी रॉय या फोटोंवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच भरपूर प्रतिक्रिया देत आहे आणि तिचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर मौनी रॉयची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. 21.9 दशलक्ष फॉलोअर्स तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.