दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सचा आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी आणि महान फलंदाजांमध्ये एबी डिव्हिलियर्सचं नाव आवर्जून घेतलं जातं. एबी डिव्हिलियर्सचा जन्म 17 फेब्रुवारी 1984 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या वार्मबाद येथे झाला. डिव्हिलियर्सनं इंग्लंडविरुद्ध 2005 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. एबीनं 14 वर्षाच्या कारकिर्दीत 223 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एबी डिव्हिलियर्सनं 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एबी डिव्हिलियर्स सध्या देशांतर्गत क्रिकेट लीगमध्ये खेलताना दिसत आहे.