छोट्या पडद्यावरील नागिन म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय तिच्या हॉट आणि बोल्ड स्टायलिश अंदाजामुळे कायम चर्चेत असते आता मौनी रॉयच्या नव्या लूकने इंटरनेटवर चांगलच तापमान वाढवलं आहे मौनी इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले ब्लॅक स्ट्रॅप ड्रेसमधील फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत या फोटोंमध्ये मौनी हॉट फिगरमध्ये पोझ देताना दिसत आहे मौनीचा हा लूक फारच सिझलिंग दिसत आहे टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मौनी रॉय नेहमीच चर्चेत असते सध्या मौनी तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे मौनी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात झळकणार असून सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे मौनीने तिच्या मेहनतीमुळे इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.