बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.



बॉयकॉट ट्रेंडमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही.



करीनानं नुकताच मुंबईत एका कार लॉन्च इव्हेंटमध्ये सहभाग घेतला.




करीनाच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलं आहे.



करीनाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती ग्रेसफुली वॉक करताना आणि तिचा आऊटफिट फ्लॉन्ट करत वॉक करताना दिसत आहे.



व्हिडीओला कमेंट करुन करीनानं केलेल्या कारच्या जाहिरातीवर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटरकरी करत आहेत.



मर्सिडीज या कारच्या इव्हेंटमध्ये करीनानं रॅम्प वॉक केला. करीनानं केलेल्या वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.



व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आता मर्सिडीजवर बहिष्कार टाका. बॉयकॉट मर्सिडीज'



तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'फक्त चित्रपट नाही तर हिच्या जाहिराती देखील बॉयकॉट करा'