टीम इंडियासाठी आशिया चषकात सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आशिया चषखात 971 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माचा क्रमांक लागतो... रोहित शर्माने ७४५ धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आशिया चषकात ६१३ धावा केल्या आहेत. दरम्यान, आशिया चषकात सर्वाधिक धावा करण्यात ओव्हरऑल सनथ जयसुर्या पहिल्या स्थानावर आहे. जयसूर्याने १२२० धावा आशिया चषकात चोपल्या आहेत. कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १०७५ धावा चोपल्या आहेत.