हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन नीरज चोप्रा याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.



नीरज चोप्रा याने ऐतिहासिक कामगिरी करुन भारताला जागतिक अॅथलेटीक्सचं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिले. तर पाकिस्तानच्या अरशद नदीम याला सिल्वर पदकावर समाधान मानावे लागले.



गोल्ड पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा याला विजयानंतर किती रक्कम मिळणार आहे, हे तुम्हाला माहितेय का ?



वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्रा याच्यावर पैशांचा वर्षाव होत आहे.



अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा याला मेडलसोबत 70 हजार डॉलर इतकी रक्कम मिळाली आहे.



भारतीय रुपयांत बोलायचे झाल्यास नीरज चोप्रा याला 58 लाख रुपये इतकी विजयाची रक्कम मिळाली आहे.



या स्पर्धेत सिल्वर पदक पटकावणाऱ्या पाकिस्तानच्या अरशद नदीम याला 35 हजार डॉलर (भारतीय रुपयात 29 लाख ) रुपये मिळणार आहेत.



विश्व अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदकावर नाव कोरणारा नीरज एकमेव भारतीय खेळाडू ठरलाय.