जिरे एक उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट आहे. हे शरीराची जळजळ कमी करण्यास उपयुक्त आहे.

धणे थंड प्रकृतीचे असतात. याच्या नियमित सेवनाने पोटातील संक्रमण, आम्लपित्त यासारख्या समस्या दूर होतात.

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात, जे शरीराचे अनेक प्रकारच्या संक्रमणापासून संरक्षण करतात.

अन्नाची चव वाढवण्याबरोबरच तो चयापचय दर वाढवतो आणि पचनक्रिया सुधारते.

गरम मसाल्यामध्ये काळ्या मिरीचाही समावेश होतो, त्यामुळे कमी वयात दिसणारी वाढत्या वयाची लक्षणं दिसणही कमी होतात.

गरम मसाल्याच्या वापरामुळे पोट फुगण्याची समस्या दूर होते.

लवंग दातांच्या समस्यांसाठी फायदेशीर समजले जाते.

तोंडातून येणाऱ्या दुर्गंधावरही गरम मसाला फायदेशीर ठरतो.

मेटाबोलिज्म वाढवण्यासाठी गरम मसाल्याचं सेवन करणं फायदेशीर ठरते.

गरम मसाल्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या जिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असते, यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते.