आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल सकाळी लवकर उठणे
फायदेशीर असते
सकाळी लवकर उठल्याने आरोग्य देखील चांगले राहते
सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने शरीराची पचन क्रिया चांगली होते, त्यामुळे ऍसिडिटी सारख्या समस्या दूर होतात
आपल्या स्किनवर सुध्दा त्याच्या परिणाम पाहायला मिळतो ,आपली स्किन फ्रेश होऊन आपल्या चेहऱ्यावर एक चमक दिसून येते
आपल्या दिवसाचे नियोजन देखील आखता येते
त्यामुळे आपल्याला दिवसभर कामाचा 'ताण' वाढत नाही
काम करताना आळस सुध्दा येत नाही आणि कामावर लक्ष्य केंद्रित करता येतं
उशीरापर्यंत झोपल्याने तुमच्या हृदयावर ताण येत असतो, तसेच लवकर उठल्याने तुम्हाला हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होतो
आपलं आरोग्य देखील चांगलं राहत आणि आपण आजारी सुध्दा कमी पडतो
म्हणून काहीसे म्हणतात लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे