पैसे घेऊन एका कार्यक्रसाटी हजर न राहिल्याबद्दल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. उत्तर प्रदेश येथील मुरादाबादच्या एसीजेएम-4 न्यायालयातून हे वॉरंट जारी करण्यात आले. सोनाक्षीला अटक करून 24 एप्रिल रोजी कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. विमानाच्या तिकिटाचे पैसे देऊनही सोनाक्षी सिन्हा दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहिली नाही, असा आरोप आहे. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीतील श्री फोर्ड ऑडिटोरियममध्ये होणार होता. सोनाक्षी सिन्हाने या कार्यक्रमचा प्रमोशन व्हिडीओ शेअर केला होता. परंतु, ती कार्यक्रमासाठी हजर राहिली नाही. सोनाक्षी सिन्हा या प्रकरणासंदर्भात आपला जबाब नोंदवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी मुरादाबादला गेली होती. पोलिसांनी सोनाक्षी सिन्हावर कलम 420 आणि 406 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे. सोनाक्षीला टॅलेंट फुलऑन आणि एक्साइड एंटरटेनमेंट कंपनीच्या माध्यमातून इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्डसाठी आमंत्रित केले होते