छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या भरपूर चर्चेत आहे.



अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत.



'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. यशच्या प्रेमात असलेल्या नेहासाठी आता सगळं वातावरण गुलाबी झालं आहे.



आता नेहाने आपल्या यशवरील प्रेमाची कबुली दिली आहे. यामुळे आता या जोडीच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येणार आहे.



यशच्या रूपाने नेहाच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आता प्रेक्षकांना मालिकेत नेहाचा नवा लूक पाहायला मिळणार आहे.



‘नेहा’ साकारणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने या खास फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.