भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहते गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या लग्नाची वाट पाहत आहे. सलमान खानचा लग्नासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमानने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, लग्न झालंय की नाही झालं? जाणून घेण्यासाठी परवापर्यंत वाट पाहा. सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. नुकताच सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचा एक फोटो व्हायरल झाला होता. फोटोमध्ये सलमान सोनाक्षीला अंगठी घालताना दिसत होता. त्यामुळे सलमान आणि सोनाक्षीनं गुपचूप लग्न केलं आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता.