मुंबई आणि पुण्यात मान्सूनचं आगमन लांबलं आहे. या दोन्ही शहरात मान्सून 25 जून नंतर येण्याची शक्यता आहे. विदर्भात आणि कोकणात काही ठिकाणी आज पाऊस पडला. विदर्भातील पावसामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पश्चिम महाराष्ट्रात 27 जून नंतर पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात आज पावसाने हजेरी लावली. तळकोकणात शनिवारपर्यंत मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. यंदा मान्सूनने वेळेपेक्षा अधिक विलंब लावल्याचं चित्र आहे.