मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ एका केमिकल टँकरला भीषण आग लागली.

या दुर्घटनेत तीन जण दगावल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

एक्स्प्रेसवेवरील पुलावर एक केमिकल टँकर भरधाव वेगामुळे पलटी झाला

पलटी झाल्यामुळे त्याच्यातलं केमिकल पुलाखालच्या रस्त्यावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर पडलं

तसंच काही वाहनांवरही सांडलं, ज्यामुळे पुलाखालील वाहनांनी पेट घेतला

दरम्यान, आग लागल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यास सुरुवात झाली

मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र अजून बंदच आहे.

आगीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे

मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे