मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसानं हजेरी लावली आहे.
चक्रीवादळामुळे काही भागात उकाड्यापासून दिलासा मिळाला असून विदर्भाची प्रतिक्षा कायम आहे
तुम्ही विकत घेतलेली छत्री एखाद्या दिव्यांग, गतिमंद मुलाला रोजगार मिळवून देऊ शकते.त्याचा उदरनिर्वाह करू शकते.
विक्रोळी येथील नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेंबल्ड एंटरप्राइजेस म्हणजेच नाडे या संस्थेत
चाळीस हजार छत्र्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे या सर्व छत्र्या इथे ट्रेनिंग घेतलेल्या दीडशे दिव्यांग आणि गतिमंद मुलांनी तयार केल्या आहेत.
85 प्रकार च्या रंगीबेरंगी , टिकाऊ, छोट्या मोठया अश्या या छत्र्या विक्रोळी च्या केंद्रात हे हात बनवत आहेत..
ही विक्री सध्या ऑनलाइन पद्धतीने आणि काही खाजगी कंपनी च्या कंपाऊंड मध्ये सुरू आहे.
या मुळे नाडे तर्फे नागरिकांना या दिव्यांगांनी तयार केलेल्या छत्र्या खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांगांनी बनविलेल्या चाळीस हजार छत्र्या विक्रीच्या प्रतीक्षेत...