मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थवर मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी
राज ठाकरेंनीदेखील निवासस्थानाबाहेर येऊन शुभेच्छा स्विकारल्या.
यावेळी राज ठाकरेंना विविध भेटवस्तू देण्यात आल्या.
राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्ते
आणि विविध क्षेत्रातील चाहते राज्यभरातून त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले
या कार्यकर्त्यांच्या आणि चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राज ठाकरेंनी खास वेळ राखून ठेवली.
त्यासाठी शिवतीर्थसमोर फुलांची सजावट करून कार्यकर्त्यांसाठी खास मंडप उभारण्यात आला आहे.
त्याशिवाय राज्यभरात मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं
राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं
मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी