आज आवाजाचे जादूगार मोहम्मद रफी यांची जयंती मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील कोटला सुल्तान सिंह गावात झाला लाहोरमध्ये उस्ताद वाहिद खान यांच्याकडून रफींनी संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर गुलाम अली खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. वयाच्या 13 व्या वर्षी रफींनी पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावर गाणं गायलं संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. आवाजाच्या रुपातून रफी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.