स्वदेशी बनावटीच्या पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर मारा करणाऱ्या पारंपरिक 'प्रलय' क्षेपणास्त्राची दुसरी उड्डाण चाचणी आज यशस्वीरीत्या घेण्यात आली.



संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी केली.



प्रथमच, सलग दोन दिवस बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या सलग दोन उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत.



उड्डाण चाचणीने मोहिमेची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. हे प्रक्षेपण क्षेपणास्त्राच्या दोन्ही प्रकारातील प्रणाली सिद्ध करते.



आजच्या प्रक्षेपणात, ‘प्रलय’क्षेपणास्त्राची अचूकता आणि लक्ष्यभेदी क्षमता सिद्ध करण्यासाठी अधिक वजनासह वेगळ्या श्रेणीसाठी चाचणी घेण्यात आली.



या प्रक्षेपणाचे, पूर्व किनारपट्टीवर तैनात इम्पॅक्ट पॉईंटजवळील डाउन रेंज जहाजे, टेलीमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक ट्रॅकिंग सिस्टीमसह सर्व रेंज सेन्सर्स उपकरणांद्वारे निरीक्षण केले गेले आहे.



'प्रलय' क्षेपणास्त्राची दुसरी उड्डाण चाचणी यशस्वी केल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि संबंधित पथकांचे अभिनंदन केले आहे.