अभिनेत्री मिथिला पालकर अल्पावधीतच घराघरात पोहोचली आहे. कुरळ्या केसांच्या या गोड मुलीने तरुणांना वेड लावलं आहे. मिथिलाला 'वेब सीरिजची क्वीन' म्हटले जाते. मिथिला नेहमीच प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करत असते. मिथिला पालकरचा जन्म 11 जानेवारी 1993 रोजी मुंबईत झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मिथिलाचं बालप दादरमध्ये गेलं. मिथिला अभिनेत्री असण्यासोबत गायिका, यूट्यूब स्टार आणि मॉडेलदेखील आहे. मिथिलाने अण्णा केंड्रिकच्या कप गाण्याच्या धर्तीवर 'ही चाल तुरुतुरु' हे क्लासिक मराठी गाणं गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मिथिलाने 2014 साली 'माझा हनीमून' या लघुपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मिथिलाच्या 'लिटील थिंग्स', 'ऑफिशिअल च्युकॅगिरी मिली','प्रेट्टी फिट' आणि 'गर्ल इन द सिटी' या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या.