मलायका अरोरा ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या नेहमीच त्यांच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असतात. मलायकाची प्रत्येक स्टाईल चाहत्यांचे मन जिंकते. पार्टी असो किंवा इव्हेंट, प्रत्येक फंक्शनसाठी मलायका असे आउटफिट निवडते, जे तिला आणखी सुंदर बनवतात. मलायकाने नुकतेच एक हॉट फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिचा डान्सिंग मूड दिसला आहे. मलायकाने हे फोटोशूट एका हटके पद्धतीने केले आहे, जे पाहून चाहत्यांच्याही नजर तिच्यावर खिळल्या आहेत. या फोटोंमध्ये मलायकाने गुलाबी रंगाचा क्रॉप शर्ट परिधान केला आहे, ज्याला सोनेरी रंगाची बटने आहेत. यालाच मॅचिंग तिचा शॉर्ट स्कर्ट आहे. मलायकाने या आउटफिटसोबत पिंक पॉइंटेड हिल्स परिधान केल्या आहे. हेवी मेकअपने आपला लूक पूर्ण करत, केस मोकळे सोडले आहेत.