साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराचा आज (18 नोव्हेंबर) वाढदिवस आहे.



नयनतारानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले, जे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.



नयनताराला साऊथची 'लेडी सुपरस्टार' असं देखील म्हटले जाते.



नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन असं आहे.



नयनताराने वयाच्या 19 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली.



अनामिका , माया, बिल्ला, यारादी नी मोहिनी , बॉडीगार्ड, कृष्णम वंदे जगद्गुरुम्, थानी ओरुवन यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये देखील नयनताराने काम केले.



गेल्या वर्षी नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी लग्नगाठ बांधली.



नयनतारा आणि विग्नेश हे जुळ्या मुलांची पालक झाले.



2023 मध्ये नयनताराने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.



जवान या चित्रपटात नयनतारा आणि शाहरुख खान यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला.