आरसा स्वच्छ करण्यासाठी टूथ पेस्टचा वापर करावा पण जेलयुक्त टूथ पेस्टस त्यात नसावी.
क्लोरीनमधील क्लिनींग गुणधर्म काही मिनिटांत आरशावरील हट्टी डाग स्वच्छ करतो.
आरसा कापडाने पुसण्याऐवजी कागदाने पुसा.
कोणत्याही पद्धतीने आरसा स्वच्छ केल्यास तो मऊ कपड्याने पुसावा.
लिंबूमध्ये असलेल्या अॅसिडिक गुणधर्मांमुळे, आरशावरील डाग काही वेळामध्ये स्वच्छ केले जातात.
आरसा पुसण्यासाठी व्हिनेगरचा वापरही तुम्ही करु शकता.
टॅल्कम पावडरमध्ये असणाऱ्या घटकांमुळे आरशावरील डाग दूर होण्यास मदत होते आणि आरसा चमकदार होतो.
मीठ किंवा बेकिंग सोड्याचा वापर आरसा स्वच्छ करण्यासाठी केला जातो.
डागांचे प्रमाण कमी असल्यास घरगुती क्लिनर किंवा साबणाच्या पाण्यानेही आरसा पुसावा.
आरसा स्वच्छ करण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा.