वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

मीराबाई आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये 55 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग करताना दिसणार आहे.

चानू प्रथमच 55 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे.

या स्पर्धेत तिने 191 किलो (86 किलो आणि 105 किलो) वजन उचलले.

सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्यामुळे मीराबाई राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे

27 वर्षीय चानू कॉमनवेल्थ रँकिंगच्या आधारे 49 किलो वजनी गटात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली होती.

भारताला आणखी सुवर्णपदके मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी चानूने 55 किलो वजनी गटात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंगापूर वेटलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही यावर्षी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे.

या स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील अव्वल आठ वेटलिफ्टर्स थेट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून मीराबाईने इतिहास रचला आहे