देशातील कोरोना रुग्णांमध्ये 7 टक्क्यांनी घट गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 13 हजार 166 नवीन रुग्ण आढळले असून 302 जणांचा मृत्यू झाला आहे काल 14 हजार 148 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजेच कालच्या तुलनेत आज कमी रुग्ण आढळले आहेत देशात गुरुवारी दिवसभरात 26 हजार 988 लोक बरे झाले आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 34 हजार 235 इतकी झाली आहे त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 13 हजार 226 झाली आहे आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 46 हजार 884 लोक संसर्गमुक्त झाले आहेत देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत सुमारे 176 कोटी कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत गुरुवारी दिवसभरात 34 लाख 4 हजार 426 डोस देण्यात आले