मलायका वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.



अनेक वेळा मलायकाला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात.



ट्रोलर्सबद्दल एका मुलाखतीमध्ये मलायकानं सांगितलं होतं, 'अनेकवेळा महिलेला तिच्या शॉर्ट स्कर्टवरून तसेच नेकलाइनवरून ट्रोल केले जाते.'



पुढे तिनं सांगितलं, 'प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळे कपडे घातल असतात. ट्रोल करणारे व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं विचार करत असतात. पण मी माझ्या आवडीनुसारच कपडे घालणार. '



ती म्हणाली, 'मी कम्फर्टेबल असेल तर मी ते कपडे घालणार मी वेडी नाहिये मला माहित आहे कशा प्रकारचे कपडे मला सूट होतात.'



नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.



व्हिडीओमध्ये मलायका व्हाईट कलरचा शर्ट, ब्राऊन कलरचा स्वेटर आणि पिच कलरचे शूज अशा लूकमध्ये दिसत आहे. मलायकाच्या या लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.



एका नेटकऱ्यानं मलायकाच्या लूकबद्दल कमेंट केली, 'पँट घरीच विसरली दीदी'