मेथीचे लाडू खाल्ल्याने, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मेथीच्या लाडूचे सेवन केल्यामुळे कंबर दुखी, सांधेदुखीचा त्रास कमी होतो. मेथीच्या लाडूमुळे हृदयाशी संबंधित त्रास कमी होतो. मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल घटवण्याचे काम करते. मेथी ही उष्ण असते, त्यामुळे ती डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांसाठी फायदेशीर असते. मेथीचे लाडूमध्ये अमायनो ऍसिड असते, त्यामुळे ते इन्सुलिनची निर्मितीला चालना देतात, त्यामुळे मधुमेही लोकांनी आहारात मेथीचे लाडू खावा. मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते, कारण शरीरात वाढलेला कोलेस्टेरॉल हा मेथीचे लाडू खाल्ल्याने कमी होतो. मेथीमध्ये आपल्या शरीराला लागणारे विटामिन्स असतात, ते आपले शरीरातील त्वचा एकदम निरोगी राखण्यास मदत करतात. मेथाचे लाडू खाल्ल्यामुळे केस गळतीच्या समस्याही कमी होतात. मेथीपासून बनवलेल्या लाडूंचे सेवन रक्तदाबाच्या समस्येमध्येही फायदेशीर मानले जाते. शरीर तंदुरुस्त आणि मजबूत बनवण्यासाठी मेथीच्या लाडूंचे सेवन देखील फायदेशीर ठरते.