वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरात नकारात्मक उर्जा असेल तर घरात ससा पाळावा. यामुळे घरात सुख आणि समृद्धी नांदते. घरात सकारात्मक उर्जेसाठी ससा पाळणे चांगले असते. तुमच्या घरातील एखादे बाळ आजारी असेल किंवा बाळाला वारंवार दृष्ट लागत असेल तर तुम्ही घरात ससा पाळायला हवा. घरात सस्याचा वावर असल्यास लहान मुलांचे मन नेहमी प्रसन्न राहते. यामुळे ते नेहमी आनंदी राहतात. तुमच्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचा दोष असल्यास घरात काळा ससा पाळणे खूप शुभ मानले जाते. काळ्या रंगाचा ससा पाळल्याने राहू ग्रहाचा प्रभाव देखील काम करत नाही, तसेच आपल्याला दैवी कृपा देखील प्राप्त होते. सस्यांना कोणत्याही संकटांचा अंदाज आधीच येत असतो. ससे तुमच्यावर येणारे संकट स्वतःवर घेत असतात. तुमच्या लहान मुलांशी खेळायला ससा एक सोबती मिळतो. आजूबाजूला ससा असल्यास तुमचे मानसिक आरोग्यही चांगले राहते. ससे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असतात. सस्याकडे केवळ पाहिल्याने तणाव दूर होतो.