हृदयविकारावर आवळा अत्यंत गुणकारी आहे. निरोगी हृदयासाठी रोज सकाळी बिया काढलेल्या आवळ्याचा ज्यूस प्यावा. केसांच्या मजबुतीसाठी आवळ्याचे तेल फायदेशीर आहे. मधुमेहाचा त्रास असल्यास आवळ्याच्या रसामध्ये हळदीचा रस समप्रमाणात मिसळून प्यावा. आवळ्याचं चूर्ण मुळ्याबरोबर घेतल्यास मूत्राशयाचा त्रास कमी होतो. आवळ्याच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. डोळ्यांच्या विकारांवरही आवळा गुणकारी ठरतो. आवळ्याचे चूर्ण चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळतो आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते. जुलाब होत असल्यास आवळ्याच्या रसामध्ये सुंठ चूर्ण घालावं. सांधेदुखी होत असल्यास आवळ्याच्या रसाबरोबर गूळ आणि आल्याचा तुकडा खावा. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.