मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो. मोड आल्यामुळे टॅनिन आणि फायटीक अॅसिड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होतं. ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो. मोड आलेली कडधान्ये वाळवल्यानंतर त्यातल्या कर्बोदकांचं आणि ‘क’ जीवनसत्वाचं प्रमाण वाढतं. मोड आलेल्या धान्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वं, खनिजे आणि कर्बोदकं असतात. रक्त शुद्ध करण्यासाठी कडधान्य अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. मोड आलेली कडधान्य खाणं पौष्टिक आहार आहे यामुळे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. यामध्ये कॅलरी कमी असल्यामुळे वाढत्या वजनाचा धोकाही कमी असतो. शरीरासाठी अत्यंत आवश्यक ठरणारी मोड आलेली कडधान्य पचण्यासाठीही हलकी असतात. तुम्हालाही भूक लागत नसेल तर मोड आलेल्या कडधान्याचं सेवन करा. नवजात बालकांमध्ये मानसिक आणि शारीरिक समस्या दूर करण्यासाठी गरोदरपणात महिलांनी मोड आलेली कडधान्य खावीत. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.