बाजरी उष्ण धान्य असल्यामुळे तुम्ही हिवाळ्यात आणि पावसाळ्यात त्याचा आहारात समावेश करु शकता. आहारात बाजरीचा समावेश केल्यास हृदय विकारासाठी फार फायदा होऊ शकतो. बाजरीमुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. अस्थमा असल्यास आहारात बाजरीचा नक्की समावेश करावा. गरोदरपणात बाजरीची भाकरी खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. बाजरीचं पीठ ग्लूटेन मुक्त असते, त्यामुळे बाजरीची भाकरी हिवाळ्यात खाल्ल्यामुळे पोटाशी आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. बाजरीमुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो शांत झोप लागते. बाजरीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास मधुमेहाचा धोकाही बऱ्याच अंशी कमी होतो. सतत सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा. जर वजन वाढले असेल तर ते कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकरीचे आहारात नियमितपणे सेवन करावे. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.