डिसेंबर (December) महिना आला की जगभरात 'मेरी ख्रिसमस'चे (Merry Christmas) बोल कानावर पडू लागतात.

'मेरी ख्रिसमस' म्हणत लोक एकमेकांना नातळ सणाच्या शुभेच्छा देतात. तसे भेटकार्डही वाटले जातात.

मात्र 'मेरी ख्रिसमस' का बोललं जातं याचं कारण तुम्हांला माहित आहे का?

दिवाळी, होळी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपण 'हॅपी न्यू इयर', 'हॅपी होली' किंवा 'हॅपी दिवाली' असे म्हणतो

मात्र ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना 'मेरी ख्रिसमस' बोललं जातं.

युरोपात 18व्या आणि 19व्या शतकात नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलून दिल्या जायच्या.

इंग्लंडमध्ये तर आजही अनेक लोक नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलूनच दिल्या जातात.

हॅपी' आणि 'मेरी' या दोन्ही शब्दांचा अर्थ आनंद असा सारखाच आहे.