सनरायझर्स हैदराबादचा राशिद खान लखनौची दुसरी पसंती ठरु शकतो. हार्दिक पांड्याला मुंबईने कायम ठेवलेले नाही. त्यामुळे तो पुढील आयपीएलमध्ये अहमदाबादकडून खेळू शकतो. इशान किशनला मुंबईने कायम केले नाही. त्यामुळे तो लखनौच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे. केएल राहुल हा लखनौ टीममध्ये सामील होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. डेव्हिड वॉर्नर अहमदाबाद फ्रँचायझीमध्ये सामील झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. अहमदाबाद संघात श्रेयस अय्यरला संधी मिळाल्याची चर्चा सुरू आहे. श्रेयसला कर्णधारपदाची संधी मिळू शकते.