भारताचा बॅडमिंटनवीर किदम्बी श्रीकांतनं नवा इतिहास घडवला आहे.



जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात एकेरीची फायनल गाठणारा श्रीकांत हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला.



त्यानं भारताच्याच लक्ष्य सेनचं कडवं आव्हान मोडीत काढून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.



श्रीकांतनं उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनवर 17-21, 21-14, 21-17 असा विजय साजरा केला.



पण हा सामना जिंकण्यासाठी त्याला 68 मिनिटं संघर्ष करायला लागला.



या सामन्यात झालेल्या पराभवामुळं लक्ष्य सेनला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.



जागतिक बॅडमिंटनचं कांस्यपदक मिळवणारा तो प्रकाश पडुकोण आणि बी. साई प्रणित यांच्यानंतर तिसरा भारतीय पुरुष ठरला.



जागतिक बॅडमिंटनचं कांस्यपदक मिळवणारा तो प्रकाश पडुकोण आणि बी. साई प्रणित यांच्यानंतर तिसरा भारतीय पुरुष ठरला.



अंतिम फेरीतील किदाम्बी श्रीकांतचा सामना आता डेन्मार्कचा अँडर अँटोनसेन आणि सिंगापूरचा केन येव लोह यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे.



किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी उपांत्य फेरीत प्रवेश करत देशासाठी दोन पदकांवर शिक्कामोर्तब केलं होतं.