शेंगदाणे

शेंगदाण्यामध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे उदासिनता, दुःख यासारख्या भावना दूर होतात आणि मेंदूला ऊर्जा मिळते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते.

हळद

हळदीमध्ये अँटी एंग्झायटीचे गुण आहेत, ज्यामुळे शारीरिक तसेच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते.

डार्क चॉकलेट

कोकोपासून बनवलेल्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे चिंता,तणाव आणि नैराश्य दूर होते.

संत्री

संत्रीमध्ये 'व्हिटॅमिन सी' असते जे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

ड्रायफ्रूट्स

दररोज ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण बनवतो आणि निरोगी राहतो.

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये आढळणारे जीवनसत्त्व, खनिजे मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये असणारी पोषक तत्वे बौधिक क्षमता वाढवण्यास मदत करतात.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या भाज्या खाल्ल्याने मेंदूला पोषण मिळते त्यामुळे स्मरणशक्ती वाढते.

अंडी

अंड्यामध्ये 'व्हिटॅमिन बी' असते जे मेंदूला निरोगी ठेवते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.