एक कप उडीद डाळीमध्ये पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याची बारीक पेस्ट करताना ३-४ चमचे पाणी घाला. उडीद डाळीच्या पेस्टमध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, मीठ, हिंग, जिरे, आलं हे पदार्थ घाला आणि मिश्रण छान एकत्र करून घ्या. त्यानंतर या मिश्रणात एक चमचा तांदळाचे पीठ, तेल आणि पाणी घालून पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्या. मिश्रण मऊ होण्यासाठी सतत ढवळत राहा. छोट्या पळीला पाण्यात बुडवून त्यावर मेदू वड्याच मिश्रण ठेवून त्याला मधोमध छिद्र करून मेदू वड्याचा आकार द्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात मेदू वडे सोडा. गॅस कमी ठेवून सोनेरी रंग येईपर्यंत मेदू वडे तळून घ्या. तुमचा रेस्टॉरंट स्टाइल 'मेदू वडा' तयार झाला. खोबऱ्याची चटणी किंवा सांबाऱ्यासोबत मेदू वड्याचा आस्वाद घ्या. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.