रुईच्या पानांचा अर्क दुधात मिसळून दातावर लावणे, त्यामुळे दातांचे दुखणे थांबते.

खोकल्यावर रुईच्या पानांचा रस खूप फायदेशीर ठरतो.

सर्दी-खोकल्यामुळे छातीत कफ झाला असेल तर रुईच्या फुलांची पाने त्यावर फायदेशीर ठरतात.

मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी रुईच्या पानांचा रस प्यावा.

मुका मार लागला असेल तर रुईच्या पानांचा लेप त्यावर लावावा, त्यामुळे लवकर आराम मिळेल.

रुईची फुले दम्याचा त्रास कमी करतात.

रुईच्या फुलांमध्ये गुलाब पाणी टाकून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या दूर होतात.

रुईच्या पानांचा रस कानात टाकल्यास कानाशी संबंधित समस्या कमी होतात.

सुकलेल्या रुईच्या फुलांच्या पाकळ्या गुलाब पाण्यात टाकाव्यात आणि त्यानंतर ते पाणी डोळ्यात घालावे यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.