उकळलेलं दूध ७-८ तास फ्रीजमध्ये ठेवावे, त्यामुळे घट्ट साय येते.

एका भांड्यात ती घट्ट साय आणि २-३ चमचे दही टाकावे ते छान ढवळून ३-४ तास फ्रीजच्या बाहेर ठेवावं.

साईचे दही गारं पाणी घालून लाकडाच्या रवीने घुसळून त्याचे लोणी तयार करावे.

लोण्यात पाणी टाकून लोणी धुवून घ्यावे. तूप कढवण्यासाठी लोणी तयार करावे.

एका भांड्यात लोणी ओतून मंद गॅसवर ठेवावे.

लोणी थोडा रंग बदलू लागल्यावर त्यातील बेरी खाली राहते आणि तूप वर येते.

अशावेळी चिमूटभर मीठ घालून गॅस बंद करावा, त्यानंतर पाण्याचा भपका त्यावर मारा.

तूप कोमट असतानाच स्टीलच्या गाळणीने गाळून घ्यावे.

तुमचे घरगुती तूप तयार झाले.

तूपासाठीचा डबा नेहमी काचेचा किंवा स्टीलचा असावा.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.