आजच्या धावपळाच्या जगात आपले जेवणाच्या वेळेवर लक्ष राहत नाही, त्यामुळे आपले स्वास्थ्य बिघडते. रात्री उशिरा जेवल्याने अन्न पचनाच्या समस्या उद्धवतात. रात्री उशिरा जेवल्यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो,याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. रोज रात्री उशिरा जेवण केल्यामुळे रोज अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. गॅसमुळे पोटात आणि छातीमध्ये जळजळ सुरू होते. तुम्हाला शांत झोपही लागणार नाही. रात्री उशिरा जेवल्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. रात्री उशिरा जेवल्यामुळे भूकेचे चक्र विस्कळीत होते. रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. रात्री 7 - 8 च्या दरम्यान जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानले जाते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.