मारुती सुझुकीने Alto K10 चा सीएनजी व्हेरिएंट लॉन्च केला आहे. याची किंमत 5.95 लाख रुपये इतकी ठेवली आहे. ही कार VXI प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. ही कार 63.57 HP पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क जनरेट करते. Alto K10 CNG चे मायलेज 33.85 kmpl इतके आहे. अल्टो K10 चार मॅन्युअल आणि दोन AMT प्रकारांमध्ये लॉन्च. यात Std, LXi, VXi आणि VXi+ चा समावेश आहे. Alto K10 CNG बाजारात टाटा Tiago CNG ला देणार टक्कर. मारुतीची ही 11वी सीएनजी कार आहे. यात पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट प्रमाणेच फीचर्स आहेत.