डोळे, मेंदू, कान, पाय, पाठ आणि मज्जातंतू असे शरीरातील अनेक भाग तुमचे संतुलन राखण्यासाठी एकत्रित काम करत असतात.

जेव्हा या प्रणालीचा कोणताही भाग योग्यरित्या कार्य करत नाही.

तेव्हा तुम्हाला चक्कर येऊ शकते.

चक्कर येणे हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.

चक्कर आल्याने तुम्ही पडल्यास किंवा बाहेर कुठेतरी चक्कर येवून पडल्यास ते धोकादायक ठरू शकते.

चक्कर येत असेल तर एक ग्लास पाणी किंवा संत्र्याचा रस प्या आणि थोडा वेळ झोपा.

ही लक्षणे 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली तर वैद्यकीय मदत घ्यावी.

जास्त वेळ उष्णतेमध्ये किंवा सूर्यप्रकाशात राहिल्यास तुमचे डिहायड्रेशन होऊ शकते.

शरीराला योग्य प्रमाणात द्रव न मिळाल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.

यामुळे चक्कर येणे आणि इतर शरीराच्या समस्या उद्भवतात.