डिसेंबर महिना सुरू झाला की, थंडी वर डोकं काढू लागते.

थंडीमध्ये आपल्या शरीराची, त्वचेची नीट काळजी घेणं गरजेचं असतं.

या दिवसात नीट काळजी न घेतल्यास आपल्याला वेगवेगळे त्वचा विकार होण्याची शक्यता असते.

थंडीला सुरुवात झाल्यावर आपल्या रोजच्या राहणीमानात काही बदल करायला हवेत.

या दिवसांमध्ये त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर ती कोरडी पडणे, ओलसरपणा कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

त्याबरोबरच त्वचेवर चट्टे पडणे, खाज उठणे या समस्या देखील त्रास देतात.

त्यामुळे सुरुवातीपासूनच त्वचेची निगा राखायला हवी.

सामान्य ते कोरड्या त्वचेसाठी पेट्रोलियम जेली, मॉइश्चरायझर्स हे लोशनपेक्षा चांगले असतात.

आंघोळीनंतर आपल्या ओल्या त्वचेवर थेट मॉइश्चरायझर लावा.

मॉइश्चरायझर शरीराच्या पृष्ठभागावरील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करेल.