घरगुती उपायांनी 'अशी' करा बॉडी डिटॉक्स



अन्न पचायला 3 ते 4 तास लागतात. त्यामुळे वेळेवर खा.



अवेळी अन्न खाल्ल्याने तुमच्या आतड्यांमध्ये अतिरिक्त अन्न जमा होईल आणि नंतर विषारी पदार्थ जमा होऊ लागतील.



सकस आहार घ्या, यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहील.



कोमट पाण्यात इसबगोल मिसळून प्या. यामुळे तुम्हाला तुमचं शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत होईल.



झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात किंवा दुधात इसबगोल मिसळून प्या, यामुळे खूप फायदा होतो.



दररोज 3 लिटरपेक्षा जास्त पाणी प्या. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितकी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ निघून जातील आणि तुमचे शरीर डिटॉक्सिफाईड होईल.



रोज कोमट पाण्यात चिया सीड्स मिसळून प्या. यामुळे चयापचय तर वाढेल आणि बॉडी डिटॉक्सिफाय होईल.



आहारात अधिक प्रोबायोटिक्स घ्या.



तुमच्या आहारात दूध, दही, ताक आणि चीज अवश्य खा, यामुळे शरीराला पोषणही मिळते आणि शरीर डिटॉक्स होते.



फळे आणि भाज्या रोज खाव्यात. त्यामुळे शरीर डिटॉक्स होते.



तुम्ही कोमट दुधात तूप टाकूनही पिऊ शकता, ते शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.