'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री निधी भानुशाली ही सोशल ‘मीडिया क्वीन’ आहे.

या मालिकेत तिने सोनू भिडेची भूमिका साकारली होती.

काही वर्षांपूर्वी या मालिकेला अलविदा म्हटल्यानंतरही निधीचे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढतच आहेत.

निधीने आता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सी-सर्फिंग करताना असे काही फोटो शेअर केले आहेत की,

पाहणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.

निधीने इन्स्टाग्रामवर सर्फिंग करतानाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

निधी भानुशालीने कर्नाटकातील मुल्की येथील बीचवर सर्फिंग करतानाचे तीन अतिशय किलर फोटो शेअर केले आहेत.

निधी भानुशालीबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक बॅकपॅकर पर्यटक देखील आहे.