देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 3451 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे वाढलेल्या रुग्णसंख्येसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 635 इतकी झाली आहे गेल्या 24 तासांत 3079 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 4 कोटी 25 लाख 57 हजार 495 वर पोहोचला आहे दिल्लीत सर्वाधिक 1407 नवीन कोरोना रुग्ण आणि दोन मृत्यूची नोंद झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र 253 नवे कोरोना रुग्ण तर कर्नाटकमध्ये 171 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून कर्नाटकात कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही शविवारी दिवसभरात देशात 3079 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे