साऊथ चित्रपटांनंतर हिंदी म्युझिक व्हिडिओंकडे वळलेली अभिनेत्री निक्की तांबोळीला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही. 'बिग बॉस 14' चा भाग बनल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. या शोमधून बाहेर आल्यानंतरच तिला सातत्याने अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत. निक्कीने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले नसेल, परंतु ती दररोज तिच्या नवीन लुकमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. निक्की तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 'बिग बॉस 14'चा भाग झाल्यापासून ती सतत चर्चेत असते. या फोटोमध्ये तिने गोल्डन कलरचा गाऊन घातलेला दिसत आहे. निक्की तांबोळीने स्मोकी मेकअप आणि पोनीटेलसह तिचा लूक पूर्ण केला आहे. निक्की शेवटची पंजाबी गायक आणि अभिनेता परमीश वर्मासोबत 'बहरी दुनिया' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. याशिवाय ती भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कॉमेडी स्टंट शो 'खतरा खतरा'चा भाग बनली होती. (Photo:nikki_tamboli/IG)